वृद्धाश्रमातून | hindi shayari for old age people | Shayarix 2.0

0
6

वृद्धाश्रमातून

अशी काय चुक अमुची झाली
वृद्धाश्रमात तू रवानगी  केली
तुझ्या खर्चासाठीबाळा
पैसे आणले होते उसने
पोटाला चिमटा काढून
पुर्ण  केले तेव्हा देणे 
आजारपणात तुझ्या
आईनं रात्र  जागून काढली
अशी काय ‌चूक झाली       

मोठ्या कष्टाने वाढविले तुला
जाणवले का‌ कधी काळी 
तू आता झाला ज्ञानी
महतभाग्य ‌तुझ्या कपाळी
पत्नी पण लाभली पैसे वाली
अशी काय चुक अमुची झाली

फाटक्यात काढले दिवस
मात्र लाड तुझे पुरविले
समृद्ध आयुष्यास्तव तुला
संस्कार सुखाचे ते दिले
थकत्या काळात तुझ्या विणा
कोण असे वाली
अशी काय ‌चूक झाली

नको तुझा पैसा आम्हाला
स्वतःचा संसार सुखे करा
जीवन हे पाण्याचा बुडबुडा
सत्कर्माची कास धरा
आमचा  देवच असेल वाली
आयुष्याच्या संध्याकाळी
अशी काय चुक झाली अमुची

जेव्हढे आयुष्य मिळाले
ते सर्व  संपुन जाईल 
आई बाबा म्हणूनफक्त
फोटो भिंतीवर राहील
म्हणशिल मी काय करू
पण आता वेळ निघुन गेली
अशी काय चुक झाली अमुची
वृद्धाश्रमात तू अमुची रवानगी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here